साक्षीदार | २८ नोव्हेबर २०२३ | जळगाव जिल्हा पोलिस मुख्यालयात कंट्रोल रूमला ऑनड्यूटीवर असताना वॉशरूममध्ये अचानक चक्कर येऊन पडल्याने गोविंद प्रेमचंद मोरे (वय- ५०, रा. भुसावळ) या पोलिस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजता घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
- Advertisement -
धुळे येथील रहिवासी असलेले गोविंद प्रेमचंद मोरे हे पत्नी व दोन मुलांसह भुसावळ येथे वास्तव्याला होते. जळगाव पोलिस मुख्यालयातील कंट्रोल रूमला ते नोकरीला होते. रविवारी ते रात्रपाळीला होते. सोमवारी सकाळी ८ वाजता ऑनड्यूटी असताना ते वॉशरूममध्ये गेले असता ते अचानक चक्कर येऊन पडल्याने बेशुध्द झाले.
- Advertisement -








