पिकअप वाहनाच्या धडकेत दोन जण ठार ; गोजोरा गावाजवळील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

भुसावळ ;- दुचाकीने जात असलेल्या दोघांना भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पिकअप वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामसिंह गमरिया भिलाला वय-४७ आणि मोटला छितरीया भिलाला वय ४० दोन्ही रा. उमरिया ता.भगवानपुरा जि. खरगोन मध्य प्रदेश असे मयत व्यक्तींची नावे आहे.

- Advertisement -

भुसावळ तालुक्यातील गोजोरा गावाजवळील रस्त्यावरून रामसिंह भिलाला आणि मोटला भिलाला हे दोघे दुचाकी क्रमांक एमपी १० झेडपी ४०१ या दुचाकीने येत होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकप वाहन क्रमांक (एमएच १५ डीके १५६९) दोघांना उडविले. या घटनेत दुचाकीवरील रामसिंह भिलाला आणि मोटला भिलाला या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी मयत रामसिंह भिलाला यांचा भाऊ शांताराम गमरिया भिलाला याने भुसावळ तालुका पोलिसात पिकअप वाहनावरील चालका विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बुधवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता पिकअप वाहनवरील चालक सुनील मीना जोहरे रा. पिंपळगाव ता. भुसावळ याच्या विरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS