जळगाव;- धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपास वर साईबाबा मंदिराजवळ आज सकाळी सुरत येथून अकोला येथे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल बसचे टायर फुटून ती पलटी झाल्याने अपघातात पाच प्रवासी जखमी झाल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सुरत येथून अकोला येथे प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी ट्रॅव्हल बस चे टायर फुटून झालेल्या अपघातात पाच प्रवासी जखमी झाल्याची घटना सकाळी सात वाजता घडली. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेत तात्काळ जखमींना जळगावतील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
या अपघातामध्ये विद्या सागर निगडे (वय ४०), सोनू अंकुश मिस्तरी (वय २७), कौतिक सुपडा गवळी (वय ५०), आशाबाई सुभाष भोसले (वय ४५, सर्व रा. सुरत) यांच्यासह १२ वर्षीय अर्चना स्वामी निकडे (रा. काठोध जि.बुलढाणा) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पाळधी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.