back to top
शनिवार, एप्रिल 19, 2025

Arrest Kejriwal ; केजरीवालांना अटक:- जळगाव जिल्हा आम आदमी पार्टी तर्फे जाहीर निषेध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Arrest Kejriwal ; साक्षीदार न्युज  ; – आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री.अरविंद केजरीवाल यांना काल रात्री ED कडून अटक करण्यात आली असून याच्या निषेधार्थ आज जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीने अमळनेर येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले व तहसीलदार साहेब यांना सदर निवेदन देण्यात आले. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांनी म्हटले की भाजपाच्या इशारावर चालणाऱ्या ईडीने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाचे पालन न करता सूडबुद्धीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली कालचा दिवस हा लोकशाहीचा काळा दिवस म्हणता येईल एकीकडे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना संपूर्ण देशात आचारसंहिता लागू असताना आम आदमी पार्टीने या निवडणुकीत भाग घेऊ नये या हेतूने इडी चा वापर करून आम आदमी पार्टीला रोखण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे अत्यंत कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेले आम आदमी पार्टी रोखण्यासाठी नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा सपाटा भाजपा सरकारने चालवलेला आहे आशा कारवायामुळे देशांमध्ये लोकशाही व संविधान जिवंत राहणार नाही ईडी. सीबीआय कोर्ट. सीआयडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट.भाजपा सरकार यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवत आहे ही देशासाठी धोक्याची घंटा असल्याच जिल्हाध्यक्ष मिलिंद चौधरी यांनी म्हटले आहे.या निषेध आंदोलनात. युवा आघाडीच्या राज्य कार्यकारणी सदस्य चंचल सोनवणे.जिल्हा उपाध्यक्ष गणेश पवार सर.संघटन मंत्री नामदेव पाटील.अमळनेरचे तालुकाध्यक्ष स्वप्नील नवल पाटील.जळगाव शहराचे माजी महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर.जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख योगेश भोई.ओम प्रकाश अग्रवाल.नारायण पितांबर पाटील तालुका उपाध्यक्ष.राजेंद्र भाऊराव पाटील तालुका संघटक.रामकृष्ण देवरे तालुका सचिव.योगेश पाटील.डॉ रुपेश संचेती.रियाज बागवान.सलीम भाई डॉ.महेंद्र साळुंखे.देविदास पाटील.दुर्गेश पवार.उमाकांत ठाकूर.नंदू जगन्नाथ पाटील.प्रतिभा पाटील.को.को.कोला सर.प्रभाकर पाटील.आदी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते

Arrest Kejriwal

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance | राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचे...

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance  साक्षीदार न्युज । सुनिल भोळे । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख...

Jalgaon Spa Center Raid Nayantara Mall | स्पा सेंटरच्या...

 Jalgaon Spa Center Raid Nayantara Mall साक्षीदार न्युज । सुनिल भोळे । जळगाव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा...

Telangana Mother Poisons | मातेचा क्रूर कृत्य: प्रियकरासाठी तिन्ही...

 Telangana Mother Poisons साक्षीदार न्युज । एका आईने आपल्या तिन्ही मुलांना विष देऊन त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 45 वर्षीय रजिता या...

RECENT NEWS