साक्षीदार | २६ ऑक्टोबर २०२३ | मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. पाटलांनी सरकारला ४० दिवसाचा वेळ दिला होता पण या दिवसात सरकारने कुठलाही निर्णय न घेतल्याने पुन्हा एकदा राज्यात आरक्षणाची लढाई सुरु झालेली आहे. तर यात आता प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप देखील केला आहे.
माझ्या घराजवळ येऊन वाहनांची तोडफोड केली. हीच मनोज जरांगे पाटील यांच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या आहे का? असा सवाल करत प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी केली आहे. झेपणार नाही आणि पेलणार नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणत होते. ते हेच आहे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मला कोणीच शांत करू शकणार नाही, असे देखील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन जणांना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. तोडफोड करताना या आरोपींनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यासंदर्भात गुणरत्न सदावर्तेंनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी माध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, मनोज जरांगेंनी तातडीने अटक करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. सदावर्ते म्हणाले की, पोलिसांच्या समोर गाड्यांची तोडफोड केली. शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का? असा प्रश्न त्यांनी मनोज जरांगे यांना त्यांनी केला आहे. मनोज जरांगे यांना अटक करण्याची मागणी देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. सरकारने एकट्या जरांगेचे ऐकू नये असेही सदावर्ते म्हणाले आहेत.