Raj Thackeray ; राज ठाकरेंना अटक करा : खरात गटाची मागणी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Raj Thackeray

साक्षीदार | १० ऑक्टोबर २०२३ | राज्यात नेहमीच टोल प्रश्नावर मनसे आक्रमक होत असतांना दिसत असते. गेल्या चार दिवसापासून देखील राज्यातील अनेक भागातील मनसे कार्यकर्ते या प्रश्नावर आक्रमक झाले असतांना राज ठाकरे यांनी देखील वक्तव्य केल्याने आता राज ठाकरेंना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करा, अशी मागणी आरपीआय खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. राज ठाकरे हे वैचारिक गोंधळलेले नेते असल्याची टीका देखील खरात यांनी केली आहे.

- Advertisement -

टोलनाक्यांवर आकारल्या जाणाऱ्या टोलच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. कार आणि इतर छोट्या वाहनांसाठी टोल आकारला तर टोल नाके जाळून टाकू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. याच इशाऱ्यावरुन सचिन खरात यांनी राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करा, अशी मागणी सचिन खरात यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. राज ठाकरे हे वैचारिक गोंधळलेले नेते असून त्यांची मराठी पाटी आणि टोलनाका ही आंदोलने फेल ठरली असल्याची टीकाही खरात यांनी केली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS