जळगावातून दुचाकी चोरणार अटकेत !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २६ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातून अनेक परिसरातून गेल्या काही महिन्यापासून नेहमीच दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच रामानंद पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आकाशवाणी चौक येथील रहिवासी भाऊसाहेब दादाजी बागुल हे दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता ते आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जवळ दुचाकी (एमएच ४१ आर २३६३) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान चोरून नेलेली दुचाकी ही लाडवंजारी मंगल कार्यालयावरून संशयित आरोपी राहुल महाजन(वय २०) हा घेऊन जात असल्याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दिली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

यांनी केली कारवाई
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संजय सपकाळे, जितेंद्र राजपूत, विजय खैरे, पोलीस नाईक हेमंत कळसस्कर, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल इरफान मलिक, विजय जाधव यांनी कारवाई करत संशयित आरोपी राहुल गणेश महाजन (वय-२०) रा.तांबापुरा, जळगाव याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS