साक्षीदार | ४ नोव्हेबर २०२३| गेल्या काही वर्षात देशभरातील अनेक राजकीय नेत्यांना पैश्याची मागणी करीत जीवे ठार मारण्याच्या धमकी आल्यानंतर पोलीस यंत्रणा खळबळून जागी झाली होती , तर मागील आठवड्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांना पाच ईमेल आले होते त्यामध्ये पैशांची मागणी केली होती आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, आता या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी तेलंगणातील 19 वर्षाच्या तरुणाला शनिवारी पहाटे मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख गणेश रमेश वनपारधी असे केली असून त्याला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. “हे काम किशोरवयीन मुलांनी केले असल्याचे दिसून येत आहे. आमचा तपास सुरू आहे आणि आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू,” मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा देत सांगितले.