Asha Bhosle | आशाताईंचे सुर थांबले? त्यांच्या गाण्यांनी मात्र अजूनही जिवंत ठेवली निसर्गाची कोमलता!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Asha Bhosle | साक्षीदार न्यूज | भारतीय संगीतविश्वातील अजरामर स्वरकन्या Asha Bhosle यांच्या निधनाच्या वृत्ताने संगीतप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. आपल्या अनोख्या आणि बहुआयामी गायकीने त्यांनी अनेक पिढ्यांचे आयुष्य समृद्ध केले. आशाताईंच्या गाण्यांमध्ये निसर्गाची कोमलता, मातीचा सुगंध आणि जीवनातील ओलावा सहजपणे जाणवतो. कविवर्य Na. Dho. Mahanor यांच्या काव्यातील मातीतली नाळ जशी जिवंत आहे, तशीच ती आशाताईंच्या सुरांतूनही अनुभवायला मिळाली. त्यांच्या गीतांमधून शेती, निसर्ग आणि ग्रामीण जीवनाचे भावविश्व जिवंत झाले. श्रद्धेय Bhawarlal Jain यांच्या कार्यातून जसे जल, जमीन आणि शेतकऱ्यांशी नाते दृढ झाले, तसेच आशाताईंच्या सुरांनी जीवनाशी असलेले नाते अधिक समृद्ध केले.

- Advertisement -

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याची आठवणही या निमित्ताने जागी झाली. ७ सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या या सोहळ्यात आशाताई भोसले आणि ज्येष्ठ साहित्यिक Bhalchandra Nemade यांना डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली होती. त्यावेळी जैन हिल्स येथे झालेली त्यांची साधी, आत्मीय आणि प्रेमळ भेट आजही स्मरणात ताजी आहे. आशाताईंच्या सुरांनी निसर्गाला आवाज दिला, मातीला अर्थ दिला आणि मनाला शांती दिली. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांचे गीतरूपी अस्तित्व कायम स्वरूपात जिवंत राहील.

अशोक भवरलाल जैन,
अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

Asha Bhosle

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Forest Department | यावलमध्ये वन विभागाची मोठी धडक! सागवान...

Forest Department यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यात वन विभागाने सागवान लाकूड तस्करीवर मोठी कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावल वन विभागाच्या...

Mahatma Phule Jayanti | भडगावात फुले जयंतीची भव्य मिरवणूक!...

Mahatma Phule Jayanti | भडगाव | सागर महाजन | येथे क्रांतीसूर्य Mahatma Jyotiba Phule यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत उत्साहात जयंती...

Molecular Lab Inquiry | जळगाव जिल्हा रुग्णालयातील ‘मॉलिक्युलर लॅब’...

Molecular Lab Inquiry | जळगाव |सुनिल भोळे | जळगाव जिल्हा रुग्णालयात गंभीर आजारांच्या निदानासाठी अत्याधुनिक 'मॉलिक्युलर डीएनए बेस्ड टेस्टिंग प्रयोगशाळा' (Molecular DNA Based Testing...

RECENT