लोकसभेआधी विधानसभा Election निवडणुकीची रणधुमाळी : वेळापत्रक जाहीर !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Election

साक्षीदार | ९ ऑक्टोबर २०२३ | २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोराम, छत्तीसगड , मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आज पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. याबाबतचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं. मिझोराममधून १३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सर्व पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी केली जाणार आहे.

- Advertisement -

मिझोराम विधानसभा निवडणुकीचं मतदान ७ नोव्हेंबर घेतलं जाणार आहे. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान तर १७ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेतलं जाणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेश- १७ नोव्हेंबर, राज्यस्थान -२३ नोव्हेंबर आणि तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान घेतलं जाणार आहे, याबाबतची माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पाचही राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. ५ डिसेंबरपर्यंत या पाच राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पाच राज्यांच्या ९४० हून अधिक आंतरराज्य सीमेवरील चेक पोस्ट्सवर बेकायदेशीर रोकड, दारू, मोफत वस्तू आणि ड्रग्ज वाहतुकीच्या कोणत्याही सीमापार हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास आम्ही सक्षम आहोत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS