विधानसभा अध्यक्षांना पुन्हा फटकारले !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १७ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या काही आमदारांना अपात्रप्रकरणी सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणाी सुरू आहे. मागील सुनावणीत कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले होते. या सुनावणीतही न्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना फटकारले असून”त्यांना माध्यमांमध्ये बोलायला वेळ आहे, पण सुनावणीसाठी वेळ नाही का?” अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आमदार अपात्रतेच्या सुनावणीत वेळकाढूपणा करत असल्याचे सांगत मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले होते. तसेच न्यायालयाने आमदारअपात्रतेसंदर्भात नवीन वेळापत्रक सादर करा, असेही निर्देश दिले होते.

आजच्या सुनावणीतही सुप्रीम कोर्टाने याच मुद्द्यावरुन विधानसभा अध्यक्षांवर पुन्हा एकदा कडक शब्दात ताशेरे ओढले. “विधानसक्षा अध्यक्ष माध्यमांमध्ये मुलाखती देतात, पण हे करायला वेळ नाही का? कोर्टाचा जरा आदर राखला जावा. ते म्हणतात की आम्ही सरकारच्या co-equal branches चा आदर राखतो. पण, आम्ही सभागृहाच्या पटलावर काय होतंय यात हस्तक्षेप करत नाही..” असे CJI धनंजय चंद्रचूड म्हणाले.दरम्यान, आजच्या सुनावणीत न्यायालयाने वेळापत्रकावर आम्ही नाराज आहोत, दसऱ्याच्या सुट्टीत तुषार मेहतांनी अध्यक्षांसोबत बसून वेळापत्रक तयार करावे असे सांगत कोर्टाने कालमर्यादा घालून देण्यापूर्वी अध्यक्षांना एक शेवटची संधी देणं गरजेचं आहे. 30 ऑक्टोबरला हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवलं जात आहे. असे न्यायालयाने म्हणले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS