शिरसोली येथे शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव : सततच्या नापिकीला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेत ज्ञानेश्वर तुकाराम खलसे (बारी) (वय ५५, रा. बारीनगर, शिरसोली प्रबो, ता. जळगाव) यांनी आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. ८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

- Advertisement -

आहे. तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथे ज्ञानेश्वर बारी हे वास्तव्यास होते. त्यांचे गावालगतच शेत असून त्यांनी शेतात ज्वारी पेरलेली होती. मात्र यंदा पिकच हाती न आल्यामुळे बारी हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. याच नैराश्यातून त्यांनी त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचा पुतण्या श्रीराम खलसे हा शेतात गेला असता, त्याला काका गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्याने घटनेची माहिती लागलीच त्यांच्या कुटुंबियांना दिली. त्यांनी तात्काळ शेतात धाव घेतली.

यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS