एरंडोल– येथे पद्मालय फाट्याच्या तीनशे फुट अंतरावर 24 रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास अक्षय भिका महाजन वय वर्ष 28 या युवकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाला दोराने फाशी घेत आपली जीवन यात्रा संपवली अक्षय हा मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवत होता विशेष हे की अक्षय हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होता अक्षय चे वडील हे का उपहारगृहावर काम करत आहेत अक्षय ची बातमी कळताच अक्षयच्या परिवाराने एकच हंबरडा फोडला घरात अठरा विश्व दारिद्र्य त्यात अक्षय ची अशी भूमिका मनाला चटका लावणारी होती अक्षय ने जाण्यापूर्वी आपल्या मित्राला फोन केल्याचे सांगण्यात आले.
दुपारी शोकाकुल वातावरणात अक्षय वर अंतिम संस्कार करण्यात आले. सदर घटने बाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांच्या मार्गदर्षणा खाली विलास पाटील हे करीत आहेत