जळगाव ;– एका १६ वर्षीय विद्यार्थीनिनीने सकाळी घरातील सर्व कामे आवरून घरातील एका खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक आणि दुर्दैवी घटना तालुक्यातील बोरनार येथे आज २८ रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
मानसी नरेंद्र देशमुख (वय १६ रा. बोरनार ता. जळगाव) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. मानसी हिने नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली होती. रविवारी दि. २८ एप्रिल रोजी मानसीने सकाळी उठल्यावर सर्व घरकाम केले.त्यानंतर घरात सदस्य असताना मानसीने दुसऱ्या खोलीत जाऊन छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. दरम्यान, कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी तातडीने मानसी हिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे आणले. त्या ठिकाणी सीएमओ डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासून तिला मयत घोषित केले. यावेळी देशमुख कुटुंबियांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. मानसी देशमुख हिने आत्महत्या कशासाठी केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.