जळगाव ; – भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका १२ वर्षाच्या गतीमंद मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वसीम खान कय्युब खान वय-२५ रा. पटेलवाडा, ममुराबाद, जळगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
जळगाव शहरातील सुभाष चौक परिसरात १२ वर्षाची चिमुकली ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. चिमुकली ही गतीमंद असून तिच्या नातेवाईकांसमोबत भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असतात. शुक्रवारी ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पिडीत चिमुकली ही सुभाष चौक परिसरात भिक मागत असतांना संशयित आरोपील वसीम खान कय्युब खान वय-२५ रा. पटेलवाडा, ममुराबाद, जळगाव याने पिडीत मुलीला जवळ बोलावून तिला दुचाकी (एमएच १९ ईएच ५४३१) वर बसवून जळगाव भुसावळ महामार्गावरील दुरदर्शन टॉवरजवळील एका शेतात नेवून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत चिमुकलीने हा प्रकार आत्या आणि नातेवाईकांना सांगितला. त्यांनी तातडीने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी ५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता संशयित आरोपी वसीम खान अय्युब खान याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यानुसार संशयित आरोपीला रविवारी ७ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता त्याच्या घरातून अटक केली आहे. दुपारी १ वाजता त्याला जिल्हा न्यायालयातील न्यायमुर्ती श्री मोहीते यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत हे करीत आहे.