यावल (साक्षीदार न्युज ) ; – तालुक्यातील आडगाव शिवारातील मोकळय व्यक्तिने शेतकऱ्याचे उभे असलेले ट्रॅक्टर जाळल्याची घटना घडली असुन पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी अनिल मधुकर पाटील राहणार आडगाव तालुका यावल यांच्या आडगाव शिवारातील मनुदेवी रस्त्यावरील शेत समोरील उभे असलेले महीन्द्रा जिओ कंपनीचे क्रमांक एमएच१९ सि जे१४९८ ट्रॅक्टर शेतमालाचे वाहतुक करणारे वाहन गोडाऊन समोर मोकळ्या जागेवर उभे असलेले वाहन दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात व्यक्तिने व्देषबुद्धिने ट्रॅक्टरच्या टायरला आग लावुन ट्रॅक्टर पेटवुन दिले असुन यात वाहनाने सुमारे २०ते २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे . याबाबत ट्रॅक्टर मालक अनिल मधुकर पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ति विरूद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टेबल वासुदेव मराठे हे करीत आहे.