भवानी पेठ येथे महिलेचे बंद घर बनावट चावीने उघडून चोरीचा प्रयत्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ; – जळगाव शहरातील भवानी पेठ परिसरात महिलेचे बंद घर बनावट चावीने उघडून चोरी करण्याचा प्रयत्न शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी सोमवार २६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, मारिया जोझर बदामी (वय-२८, रा. भवानी पेठ, जळगाव ) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना संशयित आरोपी अमजद इकबाल खान (वय-२८ रा.बिलाल चौक तंबापूरा) याने बनावट चावीच्या मदतीने घराचे लॉक उघडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात महिलेने सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी अमजद इकबाल खान (रा. बिलाल चौक, तांबापुरा) यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास रवींद्र परदेशी हे करीत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS