साक्षीदार | ३ नोव्हेबर २०२३ | राज्यातील प्रत्येक घरात पोहचलेला बेडेकर मसाला सर्वांना परिचित आहे. पण याच कंपनीबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. व्ही पी बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे ५६ व्या वर्षी शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. बेडेकर लोणचे, मसाले व चटणी या पारंपरिक मराठी खाद्यपदार्थांना घरोघरी पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
व्ही पी बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर लोणचे, मसाले व चटणीच्या पारंपरिक खाद्य व्यवसायातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. त्यांनी आज जगाचा निरोप घेतला. या कंपनीच्या यशाची कहाणीही फार रोचक आहे. विश्वनात परशराम बेडेकर यांनी 1910 मध्ये गिरगावात छोटेसे किराणा मालाचे दुकान सुरू केले होते. त्याच दुकानात त्यांनी मसाले व लोणची ठेवण्यास सुरुवात केली. या दोन्ही पदार्थांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनीया दुकानाच्या शाखा काढण्यास सुरुवात केली. मुगभाट, दादर, फोर्टमध्ये माणकेश्वर मंदिरालगत बेडेकरांची अल्पावधीतच 5 दुकाने झाली.