उमरगा । सुरज आबाचने । ग्राम संवाद सरपंच असोसिएशन च्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी बाबासाहेब सोनकांबळे एकोंडी ( ज ) ता. उमरगा यांची तर जिल्हाध्यक्ष पदी रणजित गायकवाड चिंचोली ( भु ) ता. उमरगा यांची दि 19 रोजी निवड करण्यात आली. ग्राम संवाद सरपंच असोसिएशन राज्यातील ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनच्या मार्फत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना त्यांचे अधिकार व कर्तव्याची जाणीव करून देवून शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्याचा मुख्य हेतू आहे. संघटनात्मक वाढीसाठी निवड करण्यात आल्याचे अध्यक्ष अजिनाथ धामणे पाटील यांनी सांगितले. बाबासाहेब सोनकांबळे व रणजित गायकवाड यांच्या निवडीबद्दल त्यांचे उमरगा व परिसरातील ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले.