तळेगाव येथील बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक व्हावे : जयसिंग वाघ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

तळेगाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक इमारत व स्वतःचे निवासस्थान बांधण्या करीता तळेगाव दाभाडे येथे १९४७ मध्ये २३ एकर जमीन खरेदी केलेली आहे , या ठिकाणी स्वतःचे निवासस्थान बांधले या निवासस्थानि बाबासाहेब काही दिवस विश्रांति करीता येत असत मात्र पुढं काही करणांनि ही जमीन व निवासस्थान काळाच्या पडद्याआड गेले , बहुतांश जमिनीवर इतरांची घरे बांधली गेली पण प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते , साहित्तीक किसन थुल , एडव्होकेट रंजना भोसले व जनतेने बाबासाहेबांचे निवासस्थान शोधून काढून , ताब्यात घेवून मोठे ऐतिहासिक कार्य केले आता या निवासस्थानाचे लवकरच राष्ट्रीय स्मारक व्हावे असे विचार प्रसिध्द साहित्तीक जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले .

- Advertisement -

जयसिंग वाघ यांनी ४ मार्च रोजी या निवासस्थानास भेट देवून बाबासाहेबांच्या निवासस्थाना करीता लढ़ा उभारणारे किसन थुल यांची भेट घेवून चर्चा केली . या प्रसंगी केलेल्या मनोगतात वाघ यांनी सांगितले की बाबासाहेबांनि पुणे जिल्ह्यात जवळ जवळ चार ठिकाणी१०० एकर जमीन विद्यालय , महाविद्यालय , बौद्ध स्तूप बांधण्या करीता स्वतः खरेदी केली आहे मात्र त्यांचे हे कार्य पूर्ण होवू शकले नाही . ते काम किसन थुल सारखे माणसंच पूर्ण करु शकतील .

सुरवातीस पल्लवी थुल यांनी या संदर्भाचा लढ़ा , निवासस्थानाची ऐतिहासिकता , नव्याने केलेला विकास या विषयी सविस्तर माहिती दिली .
या प्रसंगी माधुरी थुल , विश्वजीत थुल , विलास गजभिये , एल . डी. कांबळे , सचिन वाघ , मयूर वाघ , तुकाराम मोरे , प्रा. विलास गरुड़ , प्रा. सत्यजित मोरे , जीवन मोरे व इतर कार्यकर्ते हजर होते .

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS