साक्षीदार | ६ नोव्हेबर २०२३ | मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्रीपंचम येथील वृद्ध शेतकऱ्याच्या हातातील २ लाख रुपयांची रक्कम असलेली पिशवी अज्ञात दोघांनी लंपास केली. हे दोघे चोर दुचाकीवर आले व पिशवी हिसकावून धूमस्टाइल पसार झाले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर शहरात शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता भगवान विश्वनाथ पाटील हे आले होते. बँकेतून त्यांनी दोन लाख रुपये रोकड काढली व बसस्थानकाकडे जाण्यासाठी निघाले होते. पूजा सुपर शॉपीसमोरील डिव्हायडरजवळून पायी जात असताना मागून अज्ञात दोन जण दुचाकीवर आले व रोकड असलेली पिशवी हिसकावून नेली. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहेत. दरम्यान वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.