Mahatma Phule Jayanti | भडगाव | सागर महाजन | तालुक्यातील बांबरुड बुद्रुक येथे राष्ट्रपिता Mahatma Jyotiba Phule यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम महामानव Dr. Babasaheb Ambedkar बहुउद्देशीय संस्था भडगाव आणि भीम जयंती महोत्सव समिती बांबरुड बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय आबासाहेब सुनील पाटील सर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून गोवर्धन महाजन, दत्तू महाजन, मच्छिंद्र पाटील, नानासाहेब देसले, ईश्वर भाऊ बाविस्कर, कृष्णा कोळी, भागवत पाटील, रवींद्र भिल्ल तसेच संस्थेचे अध्यक्ष खेडकर अण्णा व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान संस्थेचे अध्यक्ष खेडकर अण्णा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर अध्यक्ष आबासाहेब सुनील पाटील यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकत त्यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी महात्मा फुले यांचे कार्य अजरामर असून त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला सुभाष ईश्वर महाजन, आधार महाजन, सुभाष हिंमत महाजन, कैलास महाजन, विठ्ठल महाजन, दिलीप महाजन, श्रीकांत महाजन, राजु महाजन, प्रशांत महाजन, राजेश पाटील, अवधूत पाटील, दिपक कृष्णा कोळी, मनोज पाटील सर, संदीप कोळी, हरीश जोशी, सतलाल मराठे, ऍड राकेश पाटील, दगडू ठाकरे, माणिक पिंगळे, पिरन शिवाजी पाटील, बाबूलाल तात्या, गणेश अहिरे, भरत भिल्ल, संदीप पाटील सर, सतीश पाटील, पोलिस पाटील, प्रकाश सूर्यवंशी, जयंती उत्सव अध्यक्ष विनोद खेडकर, भागवत दगडू पाटील, अरुण पाटील, डॉ रवी पाटील, शरद पवार, सुभाष पाटील, साहेबराव जाधव, ग्रामसेवक आर बी पाटील, ग्रामसेवक आनंदा मराठे, किरण पितांबर पाटील, भाऊसाहेब साळुंखे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी ऍड प्रदीप सूर्यवंशी, योगेश बाविस्कर, भूषण ब्राम्हणे, उमेश जाधव, नंदू सरदार, सुनील सोनवणे, सुरेश खेडकर, बादल अहिरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि शोषितांच्या उन्नतीसाठीच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यात आला.









