बापरे : १८ लाखांची अफूची बोंडे जप्त !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ९ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही महिन्यापासून चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गस्त सुरु केली असतांना एका कारचा संशय आल्यानंतर पाठलाग करीत 18 लाखांची अफूची बोंडे जप्त केली तर पोलिसांना पाहताच संशयित चालक पसार झाला. पोलिसांनी रेल्वे स्टेशन माल धक्क्याजवळ ही कारवाई केल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

 

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरचे पोलिस उपनिरीक्षक सुहास आवाड हे रविवारी पहाटे गस्त करीत असतांना त्यांना शहरातील धुळे रोड महाविद्यालयाजवळ कार (क्रमांक एम.पी. 09 डब्यू.सी.1485) दिसल्यानंतर त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी चालकास थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने सुसाट वेगाने कार पळवल्यानंतर पथकाने पाठलाग सुरू केल्यानंतर चाळीसगाव रेल्वे स्टेशन माल धक्क्याजवळ वाहन सोडून चालक पसार झाला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात अफूची बोंडे आढळल्याने वाहन जप्त करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या मोजणीत एक क्विंटल 80 किलो 240 गॅ्रम वजनाचे अफू बोंड जप्त करण्यात आले. याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

ही कारवाई चाळीसगाव शहरचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले, योगेश माळी, हवालदार नितीन वाल्हे, राहुल सोनवणे, विनोद भोई, सुभाष घोडेस्वार, पंढरीनाथ पवार, महेंद्र पाटील, भूषण पाटील, तुकाराम चव्हाण, दीपक पाटील, विनोद खैरनार, निलेश पाटील, शरद पाटील, प्रविण जाधव यांच्या पथकाने केली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS