निवडीनंतर महायुतीचे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत केला जल्लोष
उमरगा । सुरज आबाचने । उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे बसवराज कस्तुरे यांची तर उपसभापतीपदी शिवसेनेचे विजयकुमार माने यांची बिनविरोध निवड झाली.
महायुतीकडून बसवराज कस्तुरे आणि विजयकुमार माने यांनी अर्ज दाखल केले होते. आघाडी कडून सिद्धाराम हत्तरगे तर राजेंद्र तळखेडे यांनी अर्ज दाखल केले होते.यावेळी हत्तरगे, तळखेडे यांनी अर्ज माघार घेतल्याने बसवराज कस्तुरे यांची सभापती तर विजयकुमार माने यांची उपसभापती बिनविरोध निवड झाली.यावेळी निवडीनंतर महायुतीचे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रियांची विशेष सभा संपन्न झाली. यावेळी अधिकारी तथा सहायक निबंधक बी.व्ही. काळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
माजी मंत्री बसवराज पाटील, माजी खासदार रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबुराव पाटील, माजी सभापती अभय चालुक्य, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, युवानेते किरण गायकवाड, युवानेते शरण पाटील, आकांक्षा चौगुले, आदींनी नुतन सभापती बसवराज कस्तुरे, उपसभापती विजयकुमार माने यांचें अभिनंदन केले.
लोकसभा व विधानसभा निवडीनंतर हे पहिले मोठे यश महायुतीचे संबंधित केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विशेष सभेला माजी सभापती रणधीर पवार, प्रल्हाद काळे, मारुती पाटील, सिद्धाराम हत्तरगे, कृष्णा माने, सुभाष गायकवाड, अहिल्याबाई जगदाळे, राजेंद्र तळखेडे, किरण कुकुर्डे, शरद माने, सारिका कांबळे, विक्रम इंगळे, सचिव जाधव, बालाजी महावरकर , लक्ष्मण खराते आदी उपस्थित होते. केले. यावेळी सभापती आणि उपसभापती निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.