चेहऱ्याला हळद लावत असाल तर सावधान !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ४ नोव्हेबर २०२३ | प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्यासाठी नेहमीच घरगुती उपाय करीत असतो अशाच वेळी शरीरासाठी खूप फायदेशीर हळद मानली जात असते. तसेच बहुतेक लोक आपली त्वचा निरोगी राहण्यासाठी हळदीचा वापर करतात. मग चेहऱ्यावरील टॅनिंग, पिंपल्स अशा समस्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक हळदीचा वापर करत असतात. पण हळदीचा वापर करूनही लोकांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर हळदीमध्ये कर्क्युमिन हा घटक आढळतो जो बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतो. तसेच हा घटक विषाणूविरोधी मानला जातो.

- Advertisement -

जर चेहऱ्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करत असाल तर तुमची समस्या कमी होण्याऐवजी ती समस्या वाढू शकते. कारण बहुतेक लोकांच्या चेहऱ्याला हळदी सूट होत नाही. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर डाग येऊ शकतात किंवा चेहऱ्यावर जळजळ निर्माण होऊ शकते. कारण हळदीमध्ये एक एलर्जी असते जी संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना हानी पोहोचवू शकते. त्यामुळे हळद लावल्यानंतर काही लोकांच्या चेहऱ्याला खाज सुटते किंवा जळजळ जाणवते. त्यामुळे सेन्सिटिव्ह स्किन असलेल्या लोकांनी हळदीचा वापर करणे टाळावं.
चेहऱ्यावर हळदी लावण्याचे अनेक नुकसान देखील आहेत. यामध्ये जर तुम्ही चेहऱ्याला हळद लावली तर तुमच्या चेहऱ्यावर कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस होऊ शकतो. यामध्ये मग हळद लावल्यानंतर तुमच्या त्वचेला खाज सुटते किंवा डाग पडू शकतात.

जर तुम्हाला हळदी पासून होणारे नुकसान टाळायचे असेल तर हळदीचा योग्य वापर कसा करायचा याबाबत जाणून घ्या. यासाठी चेहऱ्यावर कधीही हळदी तशीच लावू नका. जर चेहऱ्यावर तुम्ही हळदीचा वापर करणार असाल तर बेसन आणि हळदी मिक्स करून लावा किंवा बेसन कोरफड आणि दूध यामध्ये हळद मिसळून तुम्ही त्याचा फेस पॅक चेहऱ्यावरती लावू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्याला हानी पोहोचत नाही. तुमच्या चेहऱ्यावरील समस्या देखील कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS