back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

गुलाबराव पाटील यांना एक लाखापेक्षा जास्त लीड देण्यासाठी सज्ज राहा – महायुतीचे तिन्ही जिल्हाध्यक्ष

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कार्यकर्त्यांच्या एकजुटीने महायुतीचा विजय निश्चित’

- Advertisement -

विधानसभा निवडणूक: धरणगाव महायुतीच्या मेळाव्यात गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

धरणगाव / जळगाव ( साक्षीदार न्युज ) ; – दि. 22 – विधानसभेची निवडणूक ही फक्त सत्तेसाठी नसून जनतेच्या विकासासाठी आहे. महायुतीच्या कार्यकर्ते हे माझ्यासाठी जीव की प्राण आहे. कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे पाठबळ व जनतेची साथ माझ्या पाठीशी असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.त्यांनी विरोधकांना मिश्किल भाषेत टिकाही केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित धरणगाव तालुक्याचा महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा धरणगाव येथील एस.के. कॉटन परिसर हॉल मध्ये पार पडला यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

Gulabrao Patil

गुलाबराव पाटील यांना एक लाखापेक्षा जास्त लीड देण्यासाठी सज्ज राहा ! – महायुतीचे तिन्ही जिल्हाध्यक्ष

यावेळी खासदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले की, मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदार संघात विकास कामांचा उभा केलेला डोंगर व त्यांचा सततचा दांडगा संपर्क मतदार कधी विसरणार नसून माझ्यासह सर्व लाडक्या बहिणीची गुलाबराव पाटील यांना भक्कम साथ मिळणार असल्याची ग्वाही दिली . जाती – पातीच्या प्रचाराला बळी न पडता कार्यकर्त्यांनी ‘मेरा बूथ – सबसे मजबूत’ करून गुलाबभाऊंना प्रचंड माताधीक्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी केले तर मतदार संघासाठी सर्वाधिक निधी देणारे आमदार म्हणून त्यांची ओळख झाली आहे. धरणगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांची एकजूट ही हेवा वाटणारी असून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम गुलाबराव पाटील यांनी केले आहे. गुलाबराव पाटील यांना एक लाखापेक्षा जास्त लीड देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेण्याचे आवाहन , रॉ.कॉ.चे जिल्हाध्यक्ष तथा जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी संजय पवार यांनी केले. या सोबत भाजपाचे पी.सी. आबा पाटील, संजय महाजन, सुभाष आण्णा पाटील, डी.जी. पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, गजानन पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, यांनीही मनोगत व्यक्त केली. महायुतीच्या मेळाव्याचे प्रास्ताविक विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी केले. सूत्रसंचालन भाजपाचे कैलास माळी सर यांनी केले. आभार अभिजित पाटील यांनी मानले. यावेळी एस. के. कॉटन परिसरात भगवामय वातावरण होते. शिवसेनेचे जेष्ठ नेते गुलाबराव पाटील व मान्यवरांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.

Gulabrao Patil

यांची प्रमुख उपस्थिती
याप्रसंगी खासदार स्मिताताई पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, रॉ.कॉ.चे जिल्हाध्यक्ष तथा जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरीताताई कोल्हे – माळी, रॉ.कॉ. चे योगेश देसले, भाजपा तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, रॉ.कॉ.चे तालुकाध्यक्ष श्यामकांत पाटील, भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भाजपाचे सरचिटणीस डी.जी.पाटील, सेनेचे संजय पाटील सर, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, सुभाष अण्णा पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, गजानन पाटील, युवक अध्यक्ष नाटेश्वर पवार, भाजपाचे गटनेते कैलास माळी सर एड.संजय महाजन, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, अर्जुन मानकरी, प्रमोद पाटील, युवासेनेचे भैया मराठे, महेंद्र महाजन, दिपक भदाने, भानुदास विसावे , शहर प्रमुख विलास महाजन, गटनेते पप्पू भावे, भाजपाचे दिलीप महाजन, नगरसेवक विजय महाजन, वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, बुट्या पाटील, अहमद पठाण, अजय चव्हाण, निर्दोष पाटील, नंदकिशोर पाटील, ललित येवले, भालचंद्र जाधव, नितीन बयास, शिरीष बयास, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील यांच्यासह भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS