कंपनीतून काढल्याने भररस्त्यावर एकाला मारहाण !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २९ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील एका कंपनीत अधिकारी असलेले ६४ वर्षीय व्यक्तीने कंपनीतून काढल्याचा राग आल्याने ते दुचाकीने घरी परतत असताना त्यांना प्रमोद नामदेव पाटील याने बांबूने मारहाण केली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका कंपनीत प्रमोद पाटील हा तरुण कामाला होता. त्या कंपनीतून काढून टाकण्यात आल्याने हा राग त्याच्या मनात होता. कंपनीतील अधिकारी यशवंत रामकृष्ण महाजन हे २६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी दचाकीने जळगाव येथे घरी परतत असताना नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ प्रमोद हा बांबू घेऊन उभा होता. महाजन हे येत असल्याचे दिसताच त्याने चालू दुचाकीवर त्यांना बांबूने मारण्यास सुरुवात केली. तू मला कंपनीतून का काढले, तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या मारहाणीत महाजन यांच्या खांद्याला, पायाला दुखापत होऊन ते जखमी झाले. या प्रकरणी महाजन यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS