साक्षीदार | २२ ऑक्टोबर २०२३ | राज्यभरात गेल्या काही वर्षापासून अल्पवयीन मुलीसह विवाहीतेवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक आदिवासी महिला विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर धावत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता सुरेश धस यांच्याशी संबंधित लोकांनी रविवारी 15 ऑक्टोबर आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. हि घटना c घडली आहे.
तक्रारीनुसार आरोपींनी महिलेला मारहाण केली. आरोपींनी महिलेचे कपडे फाडले. महिलेने विरोध केल्यावर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर पीडित महिला कपड्यांशिवाय रस्त्यावर आरोपींच्या मागे धावली. तेव्हाचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. पीडितेने आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह ३ जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नीला गुंडांच्या मदतीने आपली वडिलोपार्जित जमीन बळकावायची आहे, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. प्राजक्ता धस ज्या जमिनीवर दावा करत आहेत ती ६०-७० वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाकडे आहे, असा दावा पीडितेने केला आहे.