साक्षीदार | २४ नोव्हेबर २०२३ | नातवाचे पहिले मित्र नेहमीच आजी आजोबा यांना म्हणत असतात पण एका नातवाने या नात्याला काळिमा फासल्याची घटना बीड जिल्ह्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका नातवाने आपल्या ७२ वर्षीय आजीचा खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या लोणगावमध्ये 72 वर्षीय आजीच्या डोक्यात दगड टाकून तरुणाने खून केला आहे. यात आजी कौशल्याबाई किसन राऊत यांचा मृत्यू झाला आहे. तर नातू राहुल बाळासाहेब राऊत वय 29 याच्याशी घरात किरकोळ कारणावरून आदीचा वाद झाला होता. पुढे या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यामुळे नातवाला आजीचा खूप राग आला. त्याने याचा राग मनात धरून आजी कौशल्याबाई राऊत यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. या प्रकरणी नातवाविरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.