Beer Bar : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्लॅनिंग करीत यास्तव त्यात तरुणांसंह इतर सर्व वयोगटातील लोकही रात्री बाराच्या सुमारास जसा हि काटा सरकतो तसे संगीताच्या तालावर पाय देखील थिरकायला लागतात . यावेळी हॉटेल्स, क्लब यांच्याकडून खास मद्यपार्ट्यांचे आयोजन देखील करण्यात येत असते अशातच विषय येतो तो टायमिंगचा आणि म्हणूंच यावर्षी उत्पादन शुल्क विभागाकडून यावर्षी कुठलाच भंग पडणार नाही म्हणून नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यालये उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
Beer Bar बिअरबार पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षांचे स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्टची रात्र अविस्मरणीय ठरविण्यासाठी खास पार्ट्यांचे नियोजन करण्यात येते. देशी-विदेशी दारूंचा समावेश असलेल्या पार्ट्या रंगतात. नाताळसाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबरपर्यंत नियमात शिथिलता देण्यात आली आहे.
हि आहे वेळ
सकाळी १० ते रात्री १ वाजे पर्यंत वाईन शॉप (एफएल २) सूरु असणार आहे
सकाळी १० ते रात्री १ पर्यंत Beer Bar बिअर शॉपी सूरु असणार आहे
सकाळी ११ ते पहाटे ५ पर्यंत बिअर बार सूरु असणार आहे
सकाळी ११ ते पहाटे ५ पर्यंत क्लब सूरु असणार आहे
लहान मुलांना दूर ठेवा
मद्य परवान्याशिवाय कुणालाही मद्य विक्रि करू नये असे देखील निर्देश यावेळी देण्यात आले आहे कारण मद्यविक्रेते हे नियम डावलून मद्याची विक्री करीत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे . लहान मुलांना मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मद्य पार्ट्यांमध्ये लहान मुलांचा सहभाग नको, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आले.