back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Diwali ; दिवाळी पूर्वी राज्यातील ४३ तालुक्यांना मिळणार खुशखबर !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | १७ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिक कमी पाऊस झाल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना झाले आहे. यासाठी शासनाने नुकताच ट्रिगर-टू लागू करीत राज्यातील ४३ तालुके दुष्काळी ठरविले आहे. त्यात मालेगाव तालुक्याचा समावेश आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी साडेआठ ते साडेबावीस हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळू शकते.

- Advertisement -

यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा झालेला पाऊस तीन पेक्षा अधिक आठवड्याचा खंड, पाणी पातळीत घट, अपेक्षित उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट, पिकांचे नुकसान, चाऱ्याचा प्रश्न गंभीर, पाणीटंचाई अशा सर्व बाबींचा विचार करून दुष्काळासंदर्भातील ट्रिगर-टू लागू करण्यात आला आहे. यात मालेगाव तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसानभरपाई घेणारा तालुका ठरणार आहे.

याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना बँक खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम मिळू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट मिळू शकते. यंदा पावसाने तब्बल अडीच महिने मालेगाव तालुक्यात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांची पिके करपून नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मालेगाव तालुका महसूल मंडळाकडून पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. पंचनामा केल्याचा अहवालानुसार लवकरच शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

- Advertisement -

या पिकांची नुकसानभरपाई

कापूस, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग, मूग, कांदा पिकांना नुकसान भरपाई मिळू शकते.

अशी मिळेल प्रतिहेक्टर नुकसानभरपाई

पीक रुपये (प्रतिहेक्टर)

कापूस ४९,५००

भुईमूग ४२,९७१

मका ३५,५९८

कांदा ८१,४२२

ज्वारी, बाजरी ३०,०००

मूग २०,०००

उल्हासनगर, शिंदखेडा, नंदुरबार, मालेगाव, सिन्नर, येवला, बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी-पोंड, पुरंदर-सासवड, शिरुर-घोडनदी व वेल्हे, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला (सोलापूर), अंबड, बदनापूर, भोकरदन, जालना व मंठा, कडेगाव, खानापूर-विटा, मीरज, शिराळा (सांगली), खंडाळा व वाई, हातकणंगले व गडहिंग्लज, छत्रपती संभाजीनगर व सोयगाव, आंबेजोगाई, धारुर व वडवणी, रेणापूर, लोहारा, धाराशिव व वाशी, बुलढाणा व लोणार या तालुक्याचा समावेश आहे.

Diwali

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

RECENT NEWS