back to top
गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्यास होणार फायदे !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | ३१ ऑक्तोबर २०२३ | राज्यात हिवाळा सुरु झाला कि प्रत्येक परिवारातील विजेचे बिल दुप्पट सुरु होत असते. कारण जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करायला सुरूवात करतात. पण काही लोक असेही असतात जे हिवाळ्यातही थंड पाण्याने आंघोळ करतात. जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. पण गरम पाण्याने आंघोळ करून चांगलं वाटत असलं तरी जास्त गरम पाण्याने आंघोळ करण्याचे वेगवेगळे साइड इफेक्ट्सही आहेत.

- Advertisement -

थंड पाण्याने आंघोळ करण्याचा विचार फारच कमी लोक करतात. त्यांना याचे फायदेच माहीत नसतात. वेगवेगळ्या रिसर्चनुसार, थंड पाण्याने आंघोळ करणं आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर आहे. चला जाणून घेऊ थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे.

थंड पाण्याने आंघोळ करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अलर्टनेस वाढतो. थंड पाण्याने आंघोळ केल्याने हार्ट रेट वाढतो आणि श्वास घेण्याची व सोडण्याची गतीही वाढते. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने व्यक्ती जास्त अलर्ट होतो. ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरावर वेगवेगळा मनोवैज्ञानिक प्रभाव पडतो.
जर्मनीतील येना मेडिकल कॉलेजच्या एका रिसर्चनुसार, थंड पाण्याने शरीराचं मेटाबॉलिज्म वाढतं. मुळात शरीरावर थंड पाणी टाकल्याने शरीराचं तापमान कमी होऊ लागतं. अशात शरीराला गरम ठेवण्यासाठी किंवा शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्मला जास्त काम करावं लागतं. याने व्यक्तीला वजन कमी करण्यातही मदत मिळते.

- Advertisement -

जर्नल पीलॉस वनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, जे लोक थंड पाण्याने आंघोळ करतात ते काम किंवा शाळेत जाण्यासाठी 29 टक्के कमी आजारी पडतात. या रिसर्चमध्ये 3018 लोकांचा समावेश करण्यात आला होता. या रिसर्चमधून असे आढळून आले की, ज्या लोकांनी थंड पाण्याने आंघोळ केली ते कमी दिवस आजारी पडले. तसेच थंड पाण्याने आंघोळ केल्याने लोकांची रोगप्रतिकारक शक्तीही वाढली आणि त्यांची रोजची कामे करण्याची क्षमताही वाढली.

मूड चांगला होतो
काही रिसर्चमधून असेही समोर आले की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने मूडही बूस्ट होतो. तसेच थंड पाण्याने आंघोळ केल्याने न्यूरोट्रान्समीटर जसे की, नॉर एपिनेफ्रीन आणि एंडॉर्फिन्स अ‍ॅक्टिव होतात. असंही आढळून आलं आहे की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने लोकांमध्ये डिप्रेशनची लक्षणे कमी होतात. कुणालाही थोडावेळ थंड पाण्याने आंघोळ केल्यावर याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. तुम्ही काही कोमट पाण्याने आंघोळ केल्यावर काही वेळ थंड पाण्याने आंघोळ करू शकता. थंड पाण्याने आंघोळ करण्याचा वेळ 30 सेकंदपासून ते 2 मिनिटांपर्यंत असावा. तर काही लोक सांगतात की, 5 ते 10 मिनिटे थंड पाण्याने आंघोळ करावी.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज...

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात...

Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी;...

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी...

Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली...

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने...

RECENT NEWS