Bhadgaon Cricket News | भडगावच्या क्रीडा इतिहासात सुवर्णक्षण! ‘आमदार चषक’ डे-नाईट क्रिकेट स्पर्धेत आशीर्वाद रॉकर्सचा दणदणीत विजय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bhadgaon Cricket News | भडगाव | गोरख माळी | क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जोपासण्याच्या उद्देशाने भडगाव तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली ‘आमदार चषक’ (पर्व तिसरे) ही भव्य-दिव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या अटीतटीच्या स्पर्धेत आशीर्वाद रॉकर्स संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर इतिहास ११ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

ही ऐतिहासिक स्पर्धा स्वर्गीय बापूजी फाऊंडेशनचे संस्थापक लखिचंद पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे शानदार उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते झाले. भडगावच्या क्रीडा इतिहासातील ही पहिलीच डे-नाईट क्रिकेट स्पर्धा असल्याने सुरुवातीपासूनच क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आणि उत्साह पाहायला मिळाला.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण ८ नामांकित संघांनी सहभाग नोंदवत आपल्या खेळाचे कौशल्य सादर केले. दूधिया प्रकाशात उजळलेल्या मैदानावर खेळाडूंनी चौफेर फटकेबाजी करत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. अंतिम सामन्यात आशीर्वाद रॉकर्स आणि इतिहास ११ यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र निर्णायक क्षणी आशीर्वाद रॉकर्सचा कर्णधार प्रशांत सोलुके आणि भुषण वाडेकर यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाला विजेतेपद मिळवून दिले.

- Advertisement -

विजेत्या व उपविजेत्या संघांना बक्षिसांचे वितरण आमदार पुत्र सुमित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमुळे भडगाव तालुक्यातील क्रीडाविश्वाला नवी दिशा मिळाली असून हजारो नागरिक व युवकांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर उत्साहाने गजबजून गेला होता.

स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्व स्तरांतून लखिचंद पाटील व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वप्नील परदेशी, चेतन खैरनार, परीक्षित पाटील, हरीश परदेशी आणि नीरज खैरनार यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. नियोजनबद्ध कामगिरीमुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय ही क्रिकेट स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.

एकनाथ खडसेंना कोर्टाचा दणका! आधी दोषमुक्ती फेटाळली, आता थेट अजामीनपात्र वॉरंट
 एकनाथ शिंदेंच्या फोटोवर काला जादू? जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सोलापुरात खळबळ
पाचोऱ्याजवळ मध्यरात्री भीषण अपघात! कार पलटी होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी
 पिंप्राळा किरकोळ वादाचा शेवट तरुणाच्या…

Bhadgaon Cricket News

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS