Bhadgaon News | भडगावच्या बाळद रस्त्यावर वेगावर ब्रेक! नागरिकांच्या मागणीनंतर अखेर गतिरोधक बसवण्यास सुरुवात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bhadgaon News भडगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील बाळद रस्ता काँक्रिटीकरण झाल्यानंतर वाहनांच्या वेगात मोठी वाढ झाली होती. या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने शाळेत जाणारी लहान मुले, तसेच पायी चालणारे अबालवृद्ध नागरिक यांना गंभीर धोका निर्माण झाला होता.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांकडून वारंवार गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात येत होती. ही मागणी नगरसेवक लखीचंद पाटील व नगरसेविका सौ. समीक्षा लखीचंद पाटील यांच्याकडे करण्यात आली होती.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेत नगराध्यक्षा सौ. रेखा प्रदीप मालचे, शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक लखीचंद प्रकाश पाटील आणि नगरसेविका समीक्षा लखीचंद पाटील यांनी तत्काळ दखल घेतली. त्यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक ८ मधील बाळद रस्त्यावर गतिरोधक बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

- Advertisement -

या उपक्रमामुळे परिसरातील अपघातांना आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

“जनतेची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे,” असे मत गटनेते लखीचंद पाटील यांनी दैनिक साक्षीदार न्यूजशी बोलताना व्यक्त केले.

Bhadgaon News

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Jalgaon Crime News | एअरपोर्ट रोडवर थरार! गावठी कट्टा...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरालगतच्या कुसुंबा आणि एअरपोर्ट रोड परिसरात गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी थरारक पाठलागानंतर...

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

RECENT NEWS