Road Safety | बाळद रोडवर वेगाचा कहर! एका आठवड्यात अपघातांची मालिका, गतिरोधक बसवण्याची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Road Safety  भडगाव | गोरख माळी | येथील बाळद रोडवर सातत्याने वाढणारी वाहतूक आणि सुसाट धावणारी वाहने नागरिकांसाठी धोक्याची ठरत आहेत. बाळद रोडचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर वाहनांचा वेग लक्षणीय वाढला असून हा मार्ग कायमच वर्दळीचा असतो.

- Advertisement -

या परिसरात कॉलेज आणि विविध क्लासेस असल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी ये-जा करतात. मात्र या रस्त्यावर एकही गतिरोधक नसल्याने वाहनचालक बेदरकारपणे वेगात वाहने चालवताना दिसून येतात. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या आठवड्यात याच बाळद रोडवर एका दिवसात तब्बल तीन अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी बाळद रोडवर तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती देताना संजय सोनार यांनी सांगितले की, या विषयासंदर्भात लवकरच नगर परिषदेला निवेदन देण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून बाळद रोडवर शक्य तितक्या लवकर गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Road Safety

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS