Social Awareness Maharashtra | भडगावमध्ये भारूडातून लोकशाहीचा जागर; गोविंद महाराजांनी विनोदातुन भ्रष्टाचारावर घणाघात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Social Awareness Maharashtra भडगाव | गोरख माळी | लोकशाही व्यवस्थेत मतदार हा केवळ मत देणारा घटक नसून तो सत्तेचा खरा पहारेकरी आहे, हा मूलभूत संदेश देत देवाची आळंदी येथील प्रसिद्ध समाजप्रबोधक गोविंद महाराज यांनी भडगावमध्ये आपल्या भारूडाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा जागर घडवून आणला. विनोद, विचार आणि वास्तव यांचा सुरेख संगम साधत सादर झालेला हा कार्यक्रम उपस्थितांसाठी वैचारिक मेजवानी ठरला.

- Advertisement -

महाराष्ट्र पत्रकार संघ संचलित भडगाव तालुका पत्रकार संघ आणि स्व. बापुजी युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयाच्या प्रांगणात या भारूडाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करत या कार्यक्रमाने जनमानसात विचारांची ठिणगी पेटवली.

गोविंद महाराजांनी आपल्या धारदार भारूडातून भ्रष्टाचार, राजकीय उदासीनता, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांसारख्या विषयांवर परखड शब्दांत प्रहार केला. “लोकशाही मजबूत करायची असेल तर जनतेने प्रश्न विचारायला शिकले पाहिजे,” असे आवाहन करत त्यांनी दांभिकतेवर नेमके बोट ठेवले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि हास्याच्या फुलांनी भरभरून प्रतिसाद दिला.

- Advertisement -
नवनिर्वाचित नगराध्यक्षा व मान्यवरांचा गौरव

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक हेमंत अलोने होते. व्यासपीठावर आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र व पाचोरा गटनेते सुमित पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखा प्रदीप मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र महादू पाटील, गटनेते लखीचंद प्रकाश पाटील यांच्यासह पत्रकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा रेखा मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखीचंद पाटील, समाजप्रबोधक गोविंद महाराज यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकार दिलीप पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला.

 पत्रकारितेचे सामाजिक दायित्व अधोरेखित

भडगाव तालुका पत्रकार संघाने केवळ बातम्यांपुरते मर्यादित न राहता समाजाच्या वैचारिक उन्नतीसाठी घेतलेला हा पुढाकार उल्लेखनीय ठरला आहे. “इतक्या मोठ्या संख्येने नागरिक समाजप्रबोधनासाठी एकत्र येणे ही लोकशाहीसाठी आशादायी बाब आहे,” असे मत अध्यक्षीय भाषणात हेमंत अलोने यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला भडगाव तालुक्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक योगेश शिपी यांनी केले.

चौकट : पत्रकार दिनी आरोग्य सेविकांचा सन्मान

पत्रकार दिनाच्या निमित्ताने भडगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यात आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास पोलिस उपविभागीय अधिकारी विजय ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकुर, गट शिक्षण अधिकारी रावसाहेब पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकार सुनिल पाटील यांची कन्या तेजस्विनी पाटील हिने वैद्यकीय क्षेत्रात बीएएमएस पदवी प्राप्त केल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला. तसेच ‘साधना’ पुरस्काराची हॅट्ट्रिक पूर्ण करणाऱ्या दर्शन पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.

जळगावात प्रचारादरम्यान धक्कादायक प्रकार! एका उमेदवाराच्या सासऱ्याला मारहाणीचा आरोप
नातवाच्या खांद्यावर हात, डोळ्यात अश्रू आणि अपक्ष उमेदवारी मागे गुपित काय ?
जळगांव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ 22 लाख रुपयाचा विषय काय ?
“५० वर्षे झेंडा उचलणाऱ्या निष्ठावंतांचा अपमान; भाजपात कार्यकर्त्यांची क्रूर चेष्टा!”

Social Awareness Maharashtra

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS