Girna River | गिरणा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक; घोडदे येथून ट्रॅक्टर व डंपर महसूल विभागाच्या ताब्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Girna River भडगाव | गोरख माळी | भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. भडगाव शहराजवळील घोडदे परिसरातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर महसूल विभागाने ताब्यात घेतले आहे. यासोबतच एक डंपरही जप्त करण्यात आला असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

भडगावच्या तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. महसूल पथकाने घोडदे परिसरात तपासणी दरम्यान अवैध गौणखनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून ते थेट तहसील कार्यालयात जमा केले.

महसूल पथकाची संयुक्त कारवाई

या कारवाईत नायब तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, प्रविण पवार, संजय सोनवणे, गितेश महाजन, योगेश पाटील, लोकेश महाजन तसेच ग्राम महसूल सेवक नितीन मोरे, समाधान माळी, लहू कोळी आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

- Advertisement -

महसूल विभागाकडून अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

LIVE । दादांना अखेरचा निरोप । लाखो जनसमुदायांच्या डोळ्यात पाणी…

राजकारणातील ” दादा ” माणूस गेला

Girna River

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS