Revenue Department | अवैध वाळू वाहतुकीवर महसूलचा दणका! गिरणा नदीतील दोन डंपर जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Revenue Department भडगाव | गोरख माळी | तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाने कडक कारवाई करत दोन डंपर ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई आज सकाळी सुमारे आठ वाजेच्या दरम्यान चाळीसगाव रोडवर अवैध वाळू वाहतूक करत असताना करण्यात आली.

- Advertisement -

कारवाईनंतर दोन्ही डंपर भडगाव तहसील कार्यालयात जप्त करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर कारवाई तहसीलदार शितल सोलाट, नायब तहसीलदार रमेश देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहिमेत ग्राम महसूल अधिकारी पि. के. पाटील, दीपक पाटील, राहुल माळी, प्रशांत कुंभारे, महसूल सहायक महादू कोळी तसेच पोलीस कॉन्स्टेबल पी. सी. कोळी यांनी सहभाग घेतला.

- Advertisement -

जप्त करण्यात आलेल्या दोन्ही डंपरांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे. गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशाराही महसूल विभागाने दिला आहे.

Sharad Pawar Healt । शरद पवार यांची अचानक तब्बेत बिघडली

Ajit Pawar यांचा अपघातात मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितला भयानक थरार

Revenue Department

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS