Bhadgaon Nagar Parishad | भडगाव नगरपरिषदेत विविध विषय समित्यांची स्थापना; विशेष सभेत सर्व सभापतींची बिनविरोध निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Bhadgaon Nagar Parishad |गोरख माळी | महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ तसेच विषय समिती निवडणूक नियम १९६६ मधील नियम क्रमांक ३ अन्वये भडगाव नगरपरिषदेची विशेष सभा मंगळवारी (दि. २० जानेवारी) नगरपरिषद सभागृहात संपन्न झाली. या सभेत नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांची अधिकृत स्थापना करण्यात आली.

- Advertisement -

सदर विशेष सभेचे अध्यक्षस्थान भडगावच्या तहसीलदार शीतल सोलाट यांनी भूषविले. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी मंगेश देवरे उपस्थित होते. नियमाप्रमाणे राबविण्यात आलेल्या प्रक्रियेनंतर सर्व विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली.

स्थायी समितीवर लखीचंद प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी फकीर नगमाबी अलीमशाह यांची तर सदस्य म्हणून विजयकुमार रायभान भोसले, देवाजी आहीरे, युवराज पाटील, जितेंद्र पाटील यांची निवड झाली आहे.

- Advertisement -

शिक्षण समितीच्या सभापतीपदी अतुल परदेशी यांची निवड करण्यात आली असून सदस्य म्हणून देवाजी आहीरे, ज्योती पाटील, योगिता येवले आणि अमोल पाटील यांचा समावेश आहे.
आरोग्य समितीच्या सभापतीपदी इम्रानअली सैय्यद यांची निवड झाली असून खलील शेख, विजयकुमार भोसले, डॉ. प्रमोद पाटील आणि सचिन चोरडिया सदस्य म्हणून निवडले गेले आहेत.

पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत अनुजम बेग मिर्झा, वैशाली महाजन, करूणा देशमुख आणि अजनाबाई भिल्ल सदस्य आहेत.
नियोजन समितीच्या सभापतीपदी डॉ. विजयकुमार देशमुख यांची नियुक्ती झाली असून राहुल ठाकरे, योगिता येवले, रावसाहेब पाटील व अमोल पाटील सदस्य म्हणून कार्य पाहणार आहेत.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी समिक्षा लखीचंद पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत कल्पनाबाई भोई, रजनाबाई वाघ, वैशाली पाटील, किरणताई पाटील आणि अजनाबाई भिल्ल सदस्य म्हणून सहभागी आहेत.

भडगाव नगरपरिषदेतील विषय समित्यांची निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. पुढील काळात शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देत भडगावचा कायापालट घडवून आणण्याचा निर्धार करण्यात येईल. स्वच्छ, सुंदर आणि विकासाभिमुख भडगाव घडवण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे काम करू, असे मत गटनेते व स्थायी समिती सदस्य लखीचंद पाटील यांनी व्यक्त केले.

उमेदवार,महिला,कार्यकर्ते यांयाच्यावर पोलिसांचा जोरदार लाठीमार

मतदान केंद्रावर पोलिस आणि उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राढा 

जळगांव मतदान केंद्रावर मतदाराचे ब्रेन वॉश ?

Bhadgaon Nagar Parishad

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS