Mahatma Phule Jayanti | भडगावात फुले जयंतीची भव्य मिरवणूक! सजलेल्या रथावरून शहर दुमदुमले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mahatma Phule Jayanti | भडगाव | सागर महाजन | येथे क्रांतीसूर्य Mahatma Jyotiba Phule यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. ११ एप्रिल रोजी सकाळी महात्मा फुले चौक येथे माळी समाजबांधव व मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सायंकाळी सात वाजता सजवलेल्या ट्रॅक्टरवर भक्तिमय गीते वाजवत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.

- Advertisement -

Mahatma Phule Jayanti

ही मिरवणूक महात्मा फुले चौक येथून सुरू होऊन मेन रोड, बालाजी गल्ली, जागृती चौक, शनी चौक, बाजार चौक आणि खोल गल्ली या मार्गाने पुन्हा महात्मा फुले चौकात येऊन संपन्न झाली. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत वातावरण दुमदुमून टाकले.

- Advertisement -

या मिरवणुकीत भडगाव नगरपालिकेचे गटनेते लखिचंद पाटील, नगरसेवक सचिन चोरडिया, नगरसेवक देवाजी अहिरे, एकलव्य संघटनेचे रविंद्र सोनवणे, संजय सोनवणे, हर्षल पाटील, निलेश मालपुरे, रवि अहिरे, विजय महाजन, ज्येष्ठ पत्रकार शिवदास महाजन, महात्मा फुले बहुद्देशीय संस्थेचे भिकन महाजन, साहेबराव महाजन, विनोद महाजन, जग्गू भोई, सुनील महाजन, अमोल महाजन, प्रदीप महाजन, गणेश महाजन, पत्रकार नितीन महाजन, देवराम (आबा) महाजन, पत्रकार सागर महाजन, पत्रकार चेतन महाजन, पत्रकार विजय महाजन, दीपक महाजन, मुकुंदा महाजन, विष्णू महाजन, दिनेश महाजन, छोटू महाजन, गोरख महाजन, विकास महाजन, अशोक महाजन, रमेश महाजन, संतोष महाजन, गोकुळ महाजन, रावसाहेब महाजन, बबलू महाजन, दत्तात्रय महाजन, अनिल महाजन यांच्यासह महात्मा फुले बहुद्देशीय सेवा मंडळ व माळी पंच मंडळाचे सर्व सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रविण महाजन सर यांनी केले.

Mahatma Phule Jayanti

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Molecular Lab Inquiry | जळगाव जिल्हा रुग्णालयातील ‘मॉलिक्युलर लॅब’...

Molecular Lab Inquiry | जळगाव |सुनिल भोळे | जळगाव जिल्हा रुग्णालयात गंभीर आजारांच्या निदानासाठी अत्याधुनिक 'मॉलिक्युलर डीएनए बेस्ड टेस्टिंग प्रयोगशाळा' (Molecular DNA Based Testing...

Mahatma Phule Jayanti | ‘मी जोतिबा फुले बोलतोय’ने साकळी...

Mahatma Phule Jayanti साकळी | मिलिंद जंजाळे | येथे Mahatma Jyotiba Phule यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री व्याख्यानाने परिसरात सामाजिक जागृतीची...

Mahatma Phule Jayanti | बांबरुड बु.मध्ये महात्मा फुले जयंती...

Mahatma Phule Jayanti | भडगाव | सागर महाजन | तालुक्यातील बांबरुड बुद्रुक येथे राष्ट्रपिता Mahatma Jyotiba Phule यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली....

RECENT