Sant Narhari Maharaj | भडगावमध्ये भक्तिभावात संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Sant Narhari Maharaj भडगाव | गोरख माळी | भडगाव येथील देशपांडे वाडा परिसरातील विठ्ठल मंदिरात सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी भक्तिभावात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास नगरसेवक अतुल सिंह परदेशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

- Advertisement -

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश जनार्दन सोनार यांच्या हस्ते संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजाचे सचिव बाळासाहेब जडे यांनी केले.

या वेळी माजी अध्यक्ष सुरेंद्र मोरे यांनी मागील वर्षातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला तसेच पुढील काळातील कार्यकारिणीच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रतिमा पूजनानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

- Advertisement -

या कार्यक्रमास समाजातील महिला वर्गाचीही लक्षणीय उपस्थिती होती. संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी कार्यकारिणी अध्यक्ष प्रकाश सोनार, उपाध्यक्ष हेमंत विसपुते, माजी अध्यक्ष सुरेंद्र मोरे, खजिनदार महेश पोद्दार व सल्लागार मोहन सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी आरोग्य सेवक संजय कळवाडीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.

Sant Narhari Maharaj

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS