Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी; विविध मान्यवरांची उपस्थिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील संत रविदास महाराज मंदिरात सकाळी मूर्तीपूजन, आरती व भजन करण्यात आले. तसेच भडगाव शहरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्येही संत रविदास महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

- Advertisement -

महादेव गल्ली, टोणगाव, यशवंत नगर आदी भागांमध्ये समाजबांधवांनी जयंती मोठ्या उत्सवाच्या वातावरणात साजरी केली. सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (पारोळा चौफुली) येथे संत रविदास महाराज यांचे छोटे स्टेज (मंदिर) उभारण्यात आले. येथे दिवसभर भाविकांसाठी संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, प्रा. सावित्रीआई फुले, महाराणा प्रताप, वीर एकलव्य यांच्यासह विविध महापुरुषांच्या मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.

मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

या जयंतीनिमित्त समाजबांधवांनी शासकीय अधिकारी व कर्मचारी, नगराध्यक्षा, नगरसेवक, भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी, एकलव्य संघटनेचे पदाधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

या वेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ जळगाव जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे, भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पोलीस कर्मचारी निलेश ब्राम्हणकर, राजू पाटील, नगराध्यक्षा रेखा प्रदीप मालचे, सौरभ पाटील, गटनेते लखीचंद पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, नगरसेवक विजयकुमार भोसले, विशाल पाटील, जगन भोई, संतोष महाजन, अलीम शहा, देवाजी अहिरे, सुनील देशमुख, सौरभ देशमुख, राहुल ठाकरे, जितु आचारी, अतुल परदेशी, अतुल पाटील, दुर्गेश पाटील, नझिम मिर्झा, इम्रान सैय्यद अली उपस्थित होते.

विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

यावेळी भाजप नगरसेवक सचिन चोरडिया, जितेंद्र पाटील, अमोल पाटील, मुरलीधर भिल, जाकीर कुरेशी, विक्रम सोनावणे, माजी नगरसेविका योजना पाटील, डी.डी. पाटील, पत्रकार संजय पवार, लक्ष्मीकांत देसले, सागर महाजन, नितीन महाजन, देविदास महाजन, सुरेश पाटील, डी. व्ही. भोसले, भारत चव्हाण, निलेश महाले, संजय शेवाळे उपस्थित होते.

तसेच भडगाव तालुका अध्यक्ष रवि अहिरे, नगरसेवक देवाजी अहिरे, युवा तालुका अध्यक्ष सुधीर अहिरे, आबासाहेब बाविस्कर, ललित अहिरे, नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे, नानाजी अहिरे, मनोज अहिरे, मोहित अहिरे, शिवाजी अहिरे, गणेश अहिरे, रावसाहेब अहिरे, भाऊसाहेब अहिरे, राहुल अहिरे, हेमंत अहिरे, शांताराम बोरसे, प्रकाश तायडे, गणेश वैद्य, राहुल वैद्य, भीमराव बोरसे यांच्यासह महिला पदाधिकारी लता अहिरे, सरला अहिरे, पूनम अहिरे, आशा अहिरे मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन रवि अहिरे यांनी मानले.

LIVE । दादांना अखेरचा निरोप । लाखो जनसमुदायांच्या डोळ्यात पाणी…

राजकारणातील ” दादा ” माणूस गेला

Sant Ravidas Jayanti

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS