Bhadgaon School News | शाळेच्या दुर्लक्षामुळे भडगावात काळीज हादरवणारी घटना; दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Bhadgaon School News भडगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आदर्श कन्या शाळेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण भडगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळेतील नर्सरी वर्गात शिकणारी दोन चिमुकली बालके शाळेच्या आवारात असलेल्या संरक्षण भिंतीवरून घसरून थेट नाल्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने शहरात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

या दुर्घटनेत अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने, रा. आदर्श कॉलनी, भडगाव) आणि मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे २ महिने, रा. बालाजी गल्ली, भडगाव) या दोन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला. दोघेही नर्सरीमध्ये शिक्षण घेत होते. नाल्यात पडल्याने त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

प्रत्यक्षदर्शी व प्राथमिक माहितीनुसार, शाळेच्या संरक्षण भिंतीजवळ कोणतीही जाळी, अडोका किंवा सुरक्षिततेची ठोस व्यवस्था नव्हती. एवढ्या लहान वयाच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर जाण्याची परवानगी कशी देण्यात आली, त्या वेळी शिक्षक व कर्मचारी नेमके कुठे होते, विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख का ठेवण्यात आली नाही, असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच पालक, नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी शाळेकडे धाव घेतली. परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शाळेच्या हलगर्जीपणामुळे दोन निष्पाप जीव गमावल्याचा आरोप पालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणी संबंधित शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक तसेच जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना सक्तीने राबवाव्यात, अशीही मागणी होत आहे.

अंश आणि मयंक या दोन चिमुकल्यांच्या अकाली जाण्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण भडगाव शहर त्यांच्या दुःखात सहभागी झाले आहे.

Bhadgaon School News

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS