Sand Mafia Maharashtra | तहसील कार्यालयातूनच जप्त वाळूचा डंपर पळवला! भडगावात वाळू माफियांची थेट शासकीय यंत्रणेला चुनौती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Sand Mafia Maharashtra भडगाव | गोरख माळी | भडगाव तालुक्यात गिरणा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे प्रशासनापुढे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. महसूल विभागाने कारवाई करत जप्त केलेला अवैध वाळूने भरलेला डंपर काही तासांतच थेट तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

गिरड (ता. भडगाव) परिसरात गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने एमएच १५ एचडब्ल्यू ८६९९ क्रमांकाचा डंपर पकडला. संबंधित डंपर पुढील कायदेशीर कारवाईसाठी भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला होता. मात्र, शिरपूर येथील वाळू माफियांनी रात्रीच्या सुमारास थेट तहसील कार्यालयासमोरूनच हा डंपर पळवून नेल्याचा प्रकार घडला.

या घटनेनंतर महसूल विभागाच्या पथकाने भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे. कारवाईदरम्यान मंडळ अधिकारी दिनेश येंडे, ग्राम महसूल अधिकारी सुनिल मांडोळे, व्ही. सी. पाटील, दीपक पाटील, राहुल माळी, शुभम चोपडा, चेतन बैरागी, महसूल सेवक राजू थोरात, माधव सोनवणे, राजेंद्र शेवरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल बोरसे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

विशेष म्हणजे, जप्त केलेले वाहन थेट शासकीय कार्यालयाच्या आवारातूनच पळवले जात असल्याने वाळू माफियांची दहशत किती वाढली आहे, याचे हे ठळक उदाहरण असल्याची चर्चा सुरू आहे. याआधीही भडगाव तहसील कार्यालयातून ट्रॉली व ट्रॅक्टर गायब झाल्याच्या घटना घडल्या असून त्यावर ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.

या सर्व प्रकारांबाबत महसूल प्रशासनाने कठोर भूमिका का घेतलेली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जप्त केलेल्या वाहनांबाबत तत्काळ गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई का होत नाही, याबाबतही संभ्रम आहे. प्रांताधिकारी भूषण अहिरे व तहसीलदार श्रीमती शितल सोलाट यांच्याकडून या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे.

Sand Mafia Maharashtra

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS