epik ekyc | भडगाव तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली विशेष महसूल कॅम्प; नागरिकांची कामे जागेवरच मार्गी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

epik ekyc भडगाव | गोरख माळी | भडगाव तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव तलाठी कार्यालयाच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी विशेष महसूल कॅम्प मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये कॅम्प आयोजित करून महसूल विभागाशी संबंधित महत्त्वाच्या सेवा नागरिकांना तात्काळ उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

- Advertisement -

या कॅम्पमध्ये प्लॉटधारकांकडून बिनशेती सारा महसूल, तसेच शेतकऱ्यांकडून शेतीसारा महसूल भरण्याची सुविधा देण्यात येत आहे. यासोबतच ई-पीक पाहणी नोंदणीबाबत मार्गदर्शन, तसेच अनुदानासाठी आवश्यक e-KYC पूर्ण करण्याची प्रक्रिया कॅम्पच्या ठिकाणीच करून दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचत असून, प्रलंबित कामे एका ठिकाणी पूर्ण होत आहेत.

या मोहिमेचे समन्वय व नियंत्रण ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, एम. जे. खाटीक, योगेश पाटील, मंडळ अधिकारी कुणाल कोळी, महसूल सेवक श्वेता जैस्वाल, विशाल सूर्यवंशी, तसेच रितेश माळी, विनोद पाटील आणि राहुल नरवाडे यांच्या पथकाकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

भडगाव शहरातील विविध परिसरांत हे कॅम्प सुरू असून, मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आपल्या थकित महसूल भरणा व अन्य कामांची पूर्तता करत आहेत. तलाठी कार्यालयाकडून नागरिकांना या संधीचा लाभ घेऊन थकलेला महसूल त्वरित भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लाठीमार प्रकरणानंतर जळगाव पोलिस पुन्हा चर्चेत; डान्स बारमधील व्हिडिओ व्हायरल, अनेक प्रश्न अनुत्तरित
तहसील कार्यालयातूनच जप्त वाळूचा डंपर पळवला! भडगावात वाळू माफियांची थेट शासकीय यंत्रणेला चुनौती
‘अजितदादा परतणार?’ संजय राऊतांचा सकाळीच राजकीय बॉम्ब; महाविकास आघाडीत मोठी उलथापालथ होणार का?

उमेदवार,महिला,कार्यकर्ते यांयाच्यावर पोलिसांचा जोरदार लाठीमार

मतदान केंद्रावर पोलिस आणि उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राढा 

epik ekyc

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS