back to top
शुक्रवार, फेब्रुवारी 20, 2026

eklavya-jayanti 2026 | भडगावात वीर एकलव्यांना मानाचा मुजरा! शिवाजी महाराज चौकात जल्लोषात जयंती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

eklavya-jayanti 2026 भडगाव | गोरख माळी |  येथे वीर एकलव्य जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक १५ रोजी सायंकाळी आयोजित कार्यक्रमाला नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार किशोर पाटील आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखा मालचे यांच्या हस्ते वीर एकलव्य यांच्या मूर्तीचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वीर एकलव्यांना अभिवादन करत त्यांच्या त्याग, निष्ठा आणि पराक्रमाची आठवण करून दिली.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून वीर एकलव्यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करत समाजातील युवकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. त्यांच्या चिकाटी, समर्पणभाव आणि गुरुभक्तीचा आदर्श आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

- Advertisement -

या कार्यक्रमास नगर परिषद गटनेते लखीचंद पाटील, मिनाबाई मालचे, प्रदिप मालचे, संतोष महाजन, जगदीश भोई, नगरसेवक विजयकुमार भोसले, राहुल ठाकरे, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, आलीम शहा, अशोक परदेशी, एकलव्य संघटनेचे भडगाव तालुकाध्यक्ष दशरथ मोरे, संभाजी पाटील, किस्मत पहेलवान, पिंटु मराठे यांच्यासह नागरीक, आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

कार्यक्रम शांततापूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला. वीर एकलव्य जयंतीनिमित्त भडगाव शहरात सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडले.

रोहित पवारांची पत्रकार परिषद | Sharad Pawar । Ajit Pawar | NCP

eklavya-jayanti 2026

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Shiv Jayanti Celebration Yawal | शिवगर्जनेने दुमदुमले बोराळे! ग्रामपंचायतीत...

Shiv Jayanti Celebration Yawal यावल | विकी वानखेडे | बोराळे (ता. यावल) येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहपूर्ण...

Shiv Jayanti Celebration Jalgaon | शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमले विद्यालय!...

Shiv Jayanti Celebration Jalgaon जळगाव | साक्षीदार न्यूज  |  येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयात गुरुवार, दिनांक 19/02/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज...

Ajit Pawar Plane Incident | “ट्विट आधी, अपघात नंतर?”...

Ajit Pawar Plane Incident मुंबई | साक्षीदार न्यूज | अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे...

RECENT NEWS