BHU Rape Case: आयआयटी बीएचयूमध्ये 1 नोव्हेंबरच्या रात्री एक विद्यार्थिनी न्यू गर्ल्स हॉस्टेलमधून फिरायला गेली असतांना कॅम्पसमधील गांधी स्मृती वसतिगृह चौकात आपल्या मित्र सोबत बोलत दोघेही कर्मणवीर बाबा मंदिराजवळ पोहोचले होते. आणि मागून बुलेटस्वार तीन तरुण त्याठिकाणी आले आणि त्यांनी विद्यार्थिनी आणि तिच्या मित्राला अडवले. काही वेळाने त्याचा मित्र त्याला धमकावून पळूऊन लावले होते . या तिघांनी मुलीचे तोंड दाबून तिला एका कोपऱ्यात नेले. तिचे कपडे काढून तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केले. आणि त्या कृत्याचा व्हिडिओ देखील बनवला होता. आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली आणि तिचा फोन घेऊन ते पसार झाले होते .
१ नोव्हेंबरच्या रात्री IIT BHU च्या कॅम्पसमध्ये असलेल्या कर्मणवीर बाबा मंदिराजवळ एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. भेलूपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्रिज एन्क्लेव्ह कॉलनीतील रहिवासी कुणाल पांडे, बाजरडिहा येथील जीवधीपूर येथील रहिवासी आनंद, सक्षम पटेल अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही भाजपशी संबंधित आहे. कुणाल पांडे हे भाजप महानगर युनिटमध्ये आयटी विभागाचे निमंत्रक आहे, तर सक्षम पटेल हे सहसंयोजक आहे. आनंद या दोघांसोबत पार्टीच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. पोलिसांनी रविवारी तिघांचीही कारागृहात रवानगी केली.
तिघेही चेतगंजमध्ये CCTV कॅमेऱ्यात कैद
पोलिसांनी घटनेची असतांना तिघेही चेतगंजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. तेच फुटेज आता सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहे. त्यावेळी त्यांच्याकडे संशयित म्हणून पाहिले जात होते मात्र कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता मात्र पोलिस तपासांती या तिघांना अटक करण्यात आली आहे .
एक संशयित आरोपी पैकी एक दहावी पास
कुणाल पांडेचे वडील जितेंद्र पांडे यांचे निधन झाले आहे. त्यांनी बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले आहे. आनंद उर्फ अभिषेक चौहानचे वडील मुन्ना यंत्रमाग चालवतात. आनंद दहावी पास आहे. सक्षमचे वडील विजय पटेल हे खासगी नोकरी करतात. तो इंटरमिजिएट पास आहे. तिघेही एकत्र राहत होते. बीएचयू अनेकदा रात्री फिरायला बाहेर जात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे .