अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; एकाला अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

भुसावळ : शहरातील हनुमान मंदिर जवळील सार्वजनिक वाचनालय येथून जात असलेल्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवरुन घेवून जात तिच्यासोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित युवतीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी संशयित महेश ज्ञानेश्वर तायडे (रा. विठ्ठल मंदिर वार्ड, कोळीवाडा) याला पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

शहरातील विठ्ठल मंदिर वार्ड परिसरातील कोळीवाडयात संशयित महेश तायडे हा राहतो. अल्पवयीन मुलगी रस्त्याने जात असतांना मोटरसायकलवरुन आलेल्या तायडे याने मुलीला सोडून देतो असे सांगितले. मुलीने त्याला विरोध केला असता संशयिताने मुलीचा हात पकडला मोटरसायकलवर बसवून तिला घरी घेवून गेला. तसेच तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न देखील केला. मुलीने संशयिताच्या तावडीतून आपली सुटका करुन घेत घडलेली घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर पोलिसात तक्रार दिली.

संशयिताविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी करीत आहे. सदरील आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS