Mahatma Phule Jayanti भुसावळ | साक्षीदार न्यूज | येथे महान समाजसुधारक व शिक्षणप्रेमी Mahatma Jyotiba Phule यांची जयंती भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व समाजबांधवांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत जयघोष केला.

कार्यक्रमास भाजपा उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, जिल्हा सरचिटणीस परिक्षीत बऱ्हाटे, जिल्हा चिटणीस प्रविण इखणकर, शहर सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, जयंत माहुरकर, माजी ग्रामीण अध्यक्ष भालचंद्र पाटील, मनोज बियाणी, नगरसेवक गिरीश महाजन, सुजित भोळे, अल्बर्ट तायडे, रुपेश देशमुख, संजय नाहाटा, बापू महाजन, ललित मराठे, कैलास पाटील, अनिता आंबेकर, शंकर शेळके, अनिरुद्ध कुलकर्णी, राहुल तायडे, चेतन सावकारे, ऋषभसिंग राजपूत, प्रशांत पाटील, योगेंद्र हरणे, गणेश जाधव, सुनिल धीवरे, हेमंत सावकारे, अमोल पाटील, गोपी राजपूत, रहमान शेख यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी महात्मा फुले यांनी दिलेला सामाजिक समता, शिक्षण आणि शोषितांच्या उन्नतीचा संदेश पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.









