Bhusawal Bjp | साक्षीदार न्यूज | भुसावळ भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) भुसावळ शहर शाखेने आपली नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत स्टार लॉन येथे आयोजित एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात शहराध्यक्ष संदीप सुरवाडे यांनी कार्यकारणीतील पदाधिकारी आणि विविध आघाडी मोर्चांच्या अध्यक्षांची नावे जाहीर केली.
नव्या कार्यकारणीत १८ जणांचा समावेश असून, यामध्ये दोन सरचिटणीस, सात उपाध्यक्ष, सात सचिव आणि एक कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे. सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न करताना महिलांना आणि नव्या चेहऱ्यांना विशेष संधी देण्यात आली आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यकारणी खालीलप्रमाणे:
-
शहराध्यक्ष: संदीप पंडितराव सुरवाडे
- Advertisement - -
सरचिटणीस: पवन बुंदेले, सागर चौधरी
-
उपाध्यक्ष: प्रीतमा गिरीश महाजन, वैशाली ललित मराठे, विशाल जंगले, मीना लोणारी, श्रेयस इंगळे, ॲड. अभिजीत मेने, नितीन नाटकर
-
सचिव: प्रीती मुकेश पाटील, सुजित हेमराज भोळे, चेतन जैन, किरण सरोदे, रवींद्र खरात, प्रा. सीमा धीरज पाटील, लखन रणधीर
-
कोषाध्यक्ष: सागर साळी
विविध आघाडी मोर्चांचे अध्यक्ष:
-
महिला मोर्चा: वैशाली सैतवाल
-
युवा मोर्चा: संकल्प वाणी
-
अनुसूचित जाती मोर्चा: संतोष ठोकळ
-
व्यापारी आघाडी: रिषभसिंह राजपूत
-
ज्येष्ठ कार्यकर्ता: शंकर शेळके
-
अल्पसंख्यांक मोर्चा: रेहमान शेख बाबू
-
शिक्षक आघाडी: तुषार चिंधळे
-
प्रसिद्धी प्रमुख: गोकुळ बाविस्कर
या कार्यकारणीच्या माध्यमातून भुसावळ भाजपाने सामाजिक आणि राजकीय संतुलन राखण्याचा प्रयत्न केला असून, नव्या नेतृत्वाला पक्षाच्या कार्याला गती देण्याची संधी मिळणार आहे.